World Nurses Day was celebrated by honoring and felicitating all the nurses on behalf of Janakalyan Blood Center Nashik under RSS Jankalyan Samiti.
१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जनकल्याण रक्तकेंद्र नाशिकच्या वतीने नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा रामबंधू मसाले संचालक हेमंत राठी, रा. स्व. संघ नाशिक महानगर कार्यवाह सुहासजी वैद्य संस्थेचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, कार्यवाह शैलेश पंडित यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Doctors were felicitated on behalf of Janakalyan Blood Center on the occasion of World Doctors Day.

जनकल्याण रक्तकेंद्राच्या “संजीवनी २०२५” या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न.
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त ” संजीवनी २०२५ ” या विशेषांकाचे प्रकाशन करतांना गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दिप्ती देशपांडे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंके, लघु उद्योग भारती नाशिक विभाग कार्यवाह मिलिंद देशपांडे, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे नाशिक जिल्ह्यातील १५० रक्तदान शिबीर संयोजकांचे सत्कार
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शिबीर संयोजकांचा गौरव समारंभ व वर्धापन दिन सोहळा प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शतकवीर, अर्धशतकवीर, सातत्यपूर्ण रक्तदान शिबीर घेणाऱ्या १५० रक्तदान शिबीर संयोजकांचे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दिप्ती देशपांडे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंके, लघु उद्योग भारती नाशिक विभाग कार्यवाह मिलिंद देशपांडे, जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, कार्यवाह शैलेश पंडित यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी जनकल्याण रक्तकेंद्राचे सहकार्यवाह मदन भंदुरे, डॉ. रश्मी दिवे, सुबोध गर्गे, विद्या एकबोटे, विशाल पाठक, समीर देव, नरेश अहिरे, प्रदीप गुजराथी, डॉ. संगीता लोढा, डॉ. सुजाता सोनवणे, प्रशासकीय अधिकारी विनय शौचे तसेच पदाधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.